राजेश खन्ना यांचा आज स्मृतिदिन, जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या ‘या’ माहीत नसलेल्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज स्मृतीदिन आहे. १८ जुलै २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असं होतं. बॉलिवूडमध्ये त्यांना सर्वजण ‘काका’ नावानेच हाक मारायचे. त्यांनी फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक हिट सिनेमे दिले. एक कलाकार म्हणून राजेश खन्ना यांनी स्वतःची अशी वेगळी छाप सोडली की आजही त्यांना त्यांच्या हिट सिनेमांसाठी ओळखलं जातं.

राजेश खन्ना यांनी एकामागोमाग एक असे सलग १५ हिट सिनेमे दिले होते. यानंतर प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला राजेश यांच्यासोबतच काम करायचं होतं. सिनेमात राजेश खन्ना असणं हीच गोष्ट तो सिनेमा हिट करण्यासाठी पुरेशी होती. काका यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले. जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या अजून काही रंजक गोष्टी..

 राजेश खन्ना यांनी एकूण १८० सिनेमांमध्ये काम केलं. यातील १६३ सिनेमे हे फिचर फिल्म होते. १२८ सिनेमांमध्ये त्यांनी मूख्य भूमिका साकारल्या. २२ सिनेमांमध्ये दुहेरी भूमिका केल्या तर छोट्या- मोठ्या अशा १७ सिनेमांमध्ये काम केलं. १९६९ ते १९७१ या काळात त्यांनी सलग १५ हिट सिनेमे दिले. यानंतर त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार हा किताब मिळाला.

राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी तीन वेळा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. तर १४ वेळा ते या पुरस्कारांसाठी नामांकित झाले होते.

 बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनद्वारे हिंदी सिनेमांतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना चार वेळा मिळाला. तर याच पुरस्कारासाठी ते २५ वेळा नामांकित झाले होते.

राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांचीही खिल्ली उडवली होती. कारण अमिताभ सेटवर वेळेत पोहोचायचे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, क्लार्क हे वेळेवर येतात पण ते काही क्लार्क नाही तर कलाकार आहेत.

 हिंदी सिनेमांनंतर राजेश खन्ना यांनी राजकारणातही आपलं नशीब आजमावलं. काँग्रेसकडून १९९१ ते १९९६ या काळात दिल्ली लोकसभेसाठी खासदार म्हणून राजेश खन्ना यांनी काम केलं. यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.