हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर नुकतंच आगमन झालं आहे. ट्रम्प यांच्या स्वागताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतात ३६ तासांचा दौरा करणार आहेत.
२४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करण्यासाठी थांबलेले दिसत आहेत. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. बराक ओबामा दोन वेळेस भारत दौऱ्यावर आले होते.
दरम्यान ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादेत १२ हजार जवान तैनात आहेत. रोड शो मार्गावर शेकडो सीसीटीव्ही, नाइट व्हिजन कॅमेरे आहेत. सुरक्षा पथके, पतंग पकडणाऱ्या पथकांसह उंच इमारतींवर शार्पशूटर तैनात आहेत. ट्रम्प-मोदी यांच्या ‘नमस्ते मोदी’ कार्यक्रमात १ लाख लोक असतील. अशी माहिती आहे.