गर्दी करू नका! आता दारू खरेदीसाठी मिळणार टोकन

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात दारू विक्रीची दुकान सुरु करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर दारु खरेदीसाठी तळीरामांची एकच झुंबड उडाली आहे. ४० दिवसांनंतर दारू मिळणार असल्यामुळे तळीरामांनी सकाळपासूनच वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या सर्वात दारुच्या दुकानांसमोरील प्रचंड गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकार निर्माण झाला होता. त्यावरही सरकारनं मार्ग काढला असून, आता टोकन पद्धतीनं राज्यात दारू विक्री केली जाणार आहे. त्यासाठीची नियमावली राज्य उत्पादन शुल्क विभागानं जारी केली आहे.

आता अशी करावी लागेल दारू विक्री
१)दारू विक्री दुकानासमोर ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी मार्किंग करण्यात यावं. त्यामध्ये किमान ६ फुटाचं अंतर असावं.

२)दारू विक्री सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना मार्किंगमध्ये उभं राहण्याच्या सूचना द्याव्यात.

३)रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म द्यावा, ज्यामध्ये ग्राहकांचा नंबर, त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि मद्याच्या मागणीचा माहिती (ब्रँडचं नाव व किती मागणी) असावी.

४)ग्राहकांना हा फॉर्म दिल्यानंतर टोकन क्रमांक देण्यात यावा. टोकन उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर दुकानाचा शिक्का आणि मोबाईल नंबर देऊन टोकन क्रमांक लिहावा.

५)अशा पद्धतीनं एका तासात ५० ग्राहकांना सेवा देता येईल. त्यानंतर दुसऱ्या तासात ५१ ते १०० असे क्रमांक घेण्यात यावे. अशा प्रकारे ८ तासात ४०० लोकांना दारू विक्री केली जाऊ शकते. उर्वरित लोकांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगावं. यामुळे गर्दी नियंत्रित करता येईल.

६) दारू विक्री करताना सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं काटेकोटरपणे पालन करण्यात यावं. यासाठी दारू विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.

पाहणीसाठी भरारी पथकाची नेमणूक 

दरम्यान, राज्याच्या प्रत्येक विभागातील जवान, सहायक दुय्यम निरीक्षकांनी सोशल डिस्टसिंग आणि गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी, असं विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आलं आहे. गर्दी होणाऱ्या विशिष्ट भागातील पाहणीसाठी भरारी पथक नेमण्यात यावं. त्याचबरोबर उप विभागीय आयुक्त आणि अधीक्षकांनीही मद्य विक्रीच्या दुकानांसमोरील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here