हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक १ वर्ष पुढे ढकलण्यात आलं आहे. यंदा टोकियोत २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक होणार होतं. मात्र, करोनाचा संसर्ग जगभरात पसरल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं ऑलिम्पिक महासंघ आणि जपानने संयुक्त निर्णय घेत ऑलिम्पिक स्पर्धा १ वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
The Olympic Games #Tokyo2020 will be held from 23 July until 8 August 2021.
More information here: https://t.co/ST25uXKglE pic.twitter.com/sQo1TIcH5O
— #Tokyo2020 (@Tokyo2020) March 30, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.