हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील प्रत्येक शहरात वाहतूककोंडी कमी (Traffic) जास्त प्रमाणात आहेच . त्यामुळे वाहतूककोंडी पासून सुटका नाहीच असे म्हणायला वाव आहेच . कितीही रस्ते केले, वाहतूक कितीही जलद केली तरी वाहतूक कोंडीचा सामना जगभरातील मोठमोठ्या शहरांना सुद्धा करावाच लागतोय. तुम्हाला जर कोणी म्हंटल कि, सर्वाधिक वाहतूक कोंडी कोणत्या शहरात असेल तर आपसूकच तुमच्या तोंडात मुंबई किंवा पुण्याचं नाव येईल. परंतु तुम्हाला माहित आहे का? मुंबई – पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील भिवंडी (Bhiwandi) या शहरात सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय, आणि आश्चर्य म्हणजे जगातील सार्वधिक वाहतूक कोंडीमध्ये भिवंडीचा पाचवा क्रमांक लागतोय.
जगातील शहरांमध्ये वाहतूक कोंडी किती प्रमाणात आहे यावरून अमेरिकेतील बिन सरकारीसंस्थेने 152 देशांमधील 1200 हुन अधिक शहरांचा वाहतूकीचा अभ्यास केला. अभ्यासानंतर त्यांनी एक अहवाल जारी केला आहे त्यानुसार कुठल्या शहरात किती वाहतुक आहे? कुठे वाहतूक सर्वात मंद चालते? अश्या अनेक गोष्टींचा विचार करून जगातील शहरांना क्रमवारीत नेमके स्थान दिले आहेत.
नॅशनल ब्यूरो ऑफ इकनॉमिक रिसर्च (एनबीईआर) या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार top 10 शहरांच्या यादीत भारतातील पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता तसेच बिहारमधील आराह आणि महाराष्ट्र राज्यातील महत्वाचे शहर भिवंडीचा समावेश आहे. सर्वात संथ वाहतूक असलेल्या शहरांमध्ये भिवंडी 5 व्या स्थानी, कोलकाता 6 व्या स्थानी आणि आरा 7 व्या स्थानी आहे.तर गाड्या आणि माणसांची सर्वाधिक गर्दी असलेल्या शहरांमध्ये बंगळुरु 8 व्या स्थानी, मुंबई 13 व्या तर दिल्ली 20 व्या स्थानी आहे.
जगभरात अमेरिकेतील फ्लीन्ट शहरात सर्वाधिक मंद ट्रॅफिक आहे. त्यानंतर बांगलादेशची राजधानी ढाका शहरांत सर्वात हळू ट्रॅफिक पुढे सरकते. तर कोलंबियामधील बोगोटो हे शहर सर्वाधिक गर्दी असलेलं आणि वाहतूक संथपणे चालणारं शहर आहे. तर बांगलादेशातील आणि नायजेरिया देशात सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या शहरांचा समावेश आहे.