हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दुचाकींची विक्री वेगाने होत आहे. प्रत्येक कंपनी काही ऑफर्स जारी करून आपली सध्याची वाहने लोकांना विकण्यात गुंतलेली आहे. यामध्ये जर तुम्ही आपली स्वतःची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी 5 सर्वोत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया ते 5 सर्वोत्तम पर्याय कोणते आहेत.
1) Ather 450X:
Ather 450X ही एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooters) आहे. यामध्ये अनेक नवनवीन फीचर्स आहेत. या स्कूटरमध्ये 6 kW इलेक्ट्रिक मोटरसह 3.7 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. हि बाईक एका चार्जवर 146 किमीपर्यंतची रेंज देते. Ather 450X थर्ड जनरेशन किंमत सध्या 1.39 लाख रुपयांपासून सुरू होते.
2) Ola S1/S1 Pro:
Ola S1 आणि S1 Pro ह्या देखील उत्तम स्कूटर्स आहेत. सध्या 99,999 रुपये आणि 1.30 लाख एक्स-शोरूम किंमतीत या उपलब्ध आहेत. या गाड्या एका चार्जवर 141 किमीपर्यंतची रेंज देतात. याशिवाय, S1 Pro ला 4 kWh युनिट मिळते, जे 181 किमीची रेंज देते. दोघांना 8.5 kW ची इलेक्ट्रिक मोटर (Electric scooters) मिळते.
3) TVS iQube:
TVS मोटर कंपनीने नुकतेच iQube इलेक्ट्रिक स्कूटर अपडेट केली आहे. आता ते स्टँडर्ड, S आणि ST या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. त्यांची ऑन-रोड दिल्लीतील किंमत 99,130 ते 1.04 लाख रुपये आहे.
4) बजाज चेतक:
बजाज चेतक ही रेट्रो डिझाइन असलेली फॅन्सी इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooters) आहे. यात 3.8kW इलेक्ट्रिक मोटरसह 3 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर इको मोडमध्ये एका चार्जवर 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किमी प्रति जाऊ शकते.
5) Hero Vida V1:
या यादीतील शेवटची स्कूटर नुकतीच लाँच झालेली Hero Vida V1 आहे. इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooters) प्लस आणि प्रो या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्याची किंमत एक्स-शोरूम 1.45 लाख रुपये आहे. Vida V1 Plus आणि Pro ला 3.44 kWh आणि 3.94 kWh रिमूव्हेबल बॅटरी पॅक मिळतात जे 143 किमी आणि 165 किमीपर्यंत जाऊ शकतात.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय