अॅडलेड : वृत्तसंस्था – यंदाचा T-20 वर्ल्डकप खूप रंगतदार पार पडला. आता हा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आला आहे. या वर्ल्डकप अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. जे संघ फायनलला पोहोचतील अशी अपेक्षा अनेक माजी खेळाडूंनी ते संघ या स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत. या स्पर्धेत एकवेळ अशी होती कि पाकिस्तानला सेमी फायनल गाठणे पण अवघड झाले होते त्याच संघाने काल न्यूझीलंडवर मात करून या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. या स्पर्धेतील दुसरा सेमी फायनलचा सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडलेड ओव्हल (Adelaide) या मैदानावर पार पडणार आहे. मात्र या सामन्याच्या अगोदर नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा टॉस का निर्णायक ठरणार जाणून घेऊया.
अॅडलेड आणि टॉस
आतापर्यंत ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेड ओव्हल (Adelaide) मैदानावर 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट ही की यातल्या प्रत्येक सामन्यात टॉस जिंकलेल्या टीमचा पराभव झाला आहे. त्यामुळे अॅडलेड ओव्हलवर मॅच जिंकण्यासाठी एका अर्थानं रोहित शर्मानं टॉस न जिंकलेलच बरं. महत्वाची बाब ही की भारताचा बांगलादेशविरुद्धचा सामना अॅडलेडच्या (Adelaide) मैदानातच झाला होता. त्या मॅचमध्ये पहिल्यांदा रोहित टॉस हरला आणि भारतानं ती मॅच जिंकली होती.
अॅडलेडचं मैदान विराटसाठी लकी
अॅडलेड ओव्हलचं (Adelaide) मैदान विराटसाठी नेहमीच लकी मानलं जातं. इथे विराटनं दोन टी20 मॅचमध्ये 154 धावा केल्या आहेत. तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून अॅडलेडवर विराटने 907 धावा केल्या आहेत. या वर्ल्डकपमध्ये विराट जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत झालेल्या 5 मॅचमध्ये 246 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीकडून अजून एका मोठ्या खेळीची चाहत्यांना अपेक्षा असणार आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!