हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले असल्याने या ठिकाणी शाहूपुरीती सहाव्या गल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आले. यावेळी दोघांच्यात काहीवेळी महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चाही केली.
कोल्हापुरात महापुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही समोरासमोर आले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोल्हापूरकरांच्याही भुवया उंचावल्या. या ठिकाणी दोघांनी काहीवेळ चर्चाही केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याना निरोप पाठवला. त्यामध्ये त्यांनी म्हंटले की, वेगवेगळ्या पद्धतीने पाहणी करण्यापेक्ष एकत्रितपणे पाहणी करूया, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केल्यानंतर कोल्हापूर शहरात दुपारू बारा वाजता दाखल झाले तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही याचवेळी या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मुख्यमत्री ठाकरे याना विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. यात आता पुराचे पाणी ओसरल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.