बेळगाव भीषण अपघात: ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळला; 7 महिला ठार, 15 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावरून ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात महिला ठार झाल्याची दुर्देवी घटना घटना घडली आहे. आज सकाळी सकाळी 15 पेक्षा अधिक जणांची ऊस तोडणारी लोकांची टोळी बोगुर गावातून इटगीकडे जात होती. त्यावेळी चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टरच्या नदीत कोसळली.

जखमींपैकी अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना नंदगडा पोलिस ठाण्यात घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपासणी करीत आहेत. या घटनेत तंगव्वा हुंचेन्नत्ती, अशोक केदारी, शांतवा अल्गोडी, गुलाबी हुंचीकट्टी, नागाव्वा मातोळे, शांतव्वा बिझोरे, नीलव्वा मुत्नाळ यांचा मृत्यू झाला. चार महिलांचा जागीच मृृत्यु झाला तर तीन महिलांचा रुग्णालयात मृृृत्यु झाला. सर्व महिला बोगुर व आजुबाजुच्या गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन घटनास्थळी खानापुरच्या आमदार तसेच बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुखांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.