सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरालगत असणार्या वाढे गावात आज दिड वाजण्याच्या सुमारास सातार्याहून वडुथच्या दिशेने निघालेल्या ऊसाचा ट्रॅक्टरने दोन दुचाकींना उडविले. अपघातानंतर ट्रक्टरचालक घटनेच्या ठिकाणी लोक जमा झाल्याने तेथून फरार झाला आहे.
वाढे गावच्या हद्दीत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरुन आलेल्या दोन दुचाकींना उडविले. या अपघातात एका युवतीसह दोनजण जखमी झाले आहेत. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातातील एक दुचाकी ट्रक्टरच्या खालच्या भागाखाली अडकून राहिली होती. अपघातानंतर लोकांचा समुदाय जमा झल्याने घटना स्थळावरुन ट्रॅक्टर चालक पसार झाला आहे.
https://youtu.be/X7zDbg-2bco
ट्रॅक्टरच्या चाकाखाली एक दुचाकी गेल्यामुळे त्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघात पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सातारा तालुका पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. या अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा