ओव्हरटेक करणे बेतले जीवावर ! कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये ओव्हरटेकच्या नादात दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तींना भरधाव येणाऱ्या टिप्परने चिरडले आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा व तिच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुशीला कागदे व विष्णू कागदे असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सुनिता कागदे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु, प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मृतक व जखमी हे मालीपार चांदोरी येथील रहिवासी आहेत. तिघेही चांदोरी मालीपार येथील दुचाकीने कोरंभी येथे हरभरा कापणीसाठी जात होते.

अपघातानंतर वाहतूक खोळंबली
कामानिमित्त जात असताना दुचाकीने ट्रकला ओव्हरटेक केले. मात्र विरुद्ध दिशेकडून गाडी येत असल्यामुळे दुचाकी चालकाने अचानक ब्रेक मारला त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि दुचाकीवरील एक महिला जागीच ठार झाली. या अपघातात सुनिता कागदे या गंभीर जखमी झाल्या तर चालक विष्णू कागदे याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला.

ओव्हरटेक करणे जीवावर बेतले
या अपघातात ओव्हरटेक करणे दोघांच्या जीवावर बेतले आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीचालकानं घाई केली नसती तर कदाचित हा अपघात झाला नसता. या अपघातामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.