अहो आश्चर्यम!!! डांबरी रस्त्यावर धावते ट्रेन; तुम्हीही व्हाल चकित

Train Without Track
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीन ओळखला जातो. त्याचबरोबर तंत्रज्ञामध्येही चीन पुढे आहे. चीनमधील वाहतूकही पर्यावरणाला पूरक अशी आहे. त्यातच आता चीनमध्ये विना ट्रॅकची रेल्वबस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. होय, तुम्हाला हे वाचून धक्का बसेल, पण चीनमध्ये डांबरी रस्त्यावर सुसाट धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला विचार पडेल कि हे नेमकं कस शक्य झालं तर चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात ….

चीनमधील झुझुउ या शहरात विना ट्रॅकची आणि रेल्वेबस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेनचे उदघाटन हे 2017 मध्येच करण्यात आले होते. याची चाचणीही CRRC ने 30 ऑक्टोबर 2017 मध्येच केली होती. मात्र याचे डिजाईन 2023 मध्ये समोर आले आहे. विना ट्रॅकची ही रेल्वे बस रस्त्यावर चालते. रस्त्यावर पेंटने केलेल्या खुणा याचा आधार घेऊन ही रेल्वे बस रस्त्यावर धावते. आता यां खुणा कश्या शोधल्या जातात. तर या पेंट केलेल्या खुणा ओळखण्यासाठी वाहणाच्या खाली सेन्सर्स बसवलेले आहे. त्याद्वारे याचा शोध घेतला जातो आणि त्यावर ही गाडी चालते. यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे ही रेल्वे बस सुसाट धावते. यां रेल्वे बसची कार्यक्षमता आणि सुरक्षितता नेव्हीगेशन ऑपरेटर्सवर अवलंबून असते.

किती आहे वेग?

या रेलबसचे नेटवर्क वाढवण्याची सुरुवात ही 2018 सालपासून करण्यात आली आहे. विना रेल्वे ट्रॅकची असलेली ही रेल्वे बस 70 किलोमीटर प्रति तास धावत असून या गाडीमध्ये 300 प्रवासी ने – आण करण्याची क्षमता आहे. तसेच यां रेल्वेबसला 25 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी केवळ 10 मिनिटाचे चार्जिंग करावी लागते. या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चीनमधील नागरिकांना याचा चांगला फायदा होत आहे.

2024 मध्ये चीनमधील पर्यावरणाला पूरक प्रवासाचे वाढणार प्रमाण

चीनमधील बीजिंगच्या मध्यवर्ती जिल्ह्यांमध्ये पर्यावरणाला पूरक असणाऱ्या प्रवासाचे प्रमाण हे 2023 अखेर 74.7 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली होती. या नवीन वर्षात हा प्रवास सर्वाधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच्या राजधानीतील बस, बस लाईन सर्वाधिक बनली असून रेल्वे ट्रान्झिट नेटवर्कचे स्केल चीनमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.