नवी दिल्ली । बरीच वाट पहिल्या नंतर भारतात एकदाचे WhatsApp Pay फीचर लॉन्च झाले आहे. आता आपण Google pay, Phone Pay यांच्या सारखेच व्हॉट्सअॅपवरुनही पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सेवा सध्या दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्हॉट्सअॅपला ही सुविधा केवळ 2 कोटी युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. सध्या भारतात सुमारे 400 कोटी लोकं व्हॉट्सअॅप वापरतात.
हा नियम 1 जानेवारीपासून लागू होईल
एकूण व्हॉल्यूमपैकी तीस टक्के UPI ट्रान्सझॅक्शन हे थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्ससाठीच व्हॅलीड असेल असेही NCPI ने निर्देश दिलेले आहेत. हा नियम पुढील वर्षी 1 जानेवारीपासून लागू होईल.
आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट करून आपणास व्हॉट्सअॅप पेची सुविधा मिळाली आहे की नाही ते युझर्स तपासू शकतात. आपण ही नवीन सर्व्हिस कशी वापरायची ते जाणून घ्या.
व्हॉट्सअॅपवर पेमेंट कसे द्यायचे (how to transfer money on whatsapp)
> अॅप उघडल्यानंतर वरच्या उजव्या कोपर्यातील तीन ठिपक्यांवर टॅप करा.
> नंतर सिलेक्ट पेमेंट्स वर क्लिक करा आणि पेमेंट्स मेथड जोडा.
> आता तुम्हाला बँकांच्या लिस्ट मधून तुमची बँक निवडायची आहे.
> अॅप तुमची बँक वेरीफाय करण्यासाठी OTP पाठवेल.
> बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर एक मेसेज येईल.
> आता आपणास ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्यांचा चॅट बॉक्स उघडावा लागेल.
> यानंतर तुम्हाला अटॅचमेंट आयकॉनवर जाऊन पेमेंट ऑप्शनवर जावे लागेल.
> तुम्हाला चॅट बॉक्समध्ये पेमेंटचा मेसेज दिसेल.
बाजारात स्पर्धा वाढेल
भारतात पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर बरेच दिवस काम चालू होते. त्याची अंमलबजावणी आता झाली आहे. ही सुविधा निवडलेल्या युझर्ससाठी हळूहळू वाढविली जाईल. यामुळे बाजारात स्पर्धाही वाढेल. Google pay, Phone Pay आणि Paytm सोबतच व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस मार्केटमध्ये स्पर्धाही करेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.