Sunday, June 4, 2023

आत्महत्या केलेल्या 57 एसटी कामगाराच्या वारसांना नोकरी देणार; परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जाणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या सुरुवातीस परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची घोषणा केली. राज्यात ज्या 57 एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्या आत्महत्येमागचे कारण तपासले जाणार आहे. तसेच आत्महत्या केलेल्या एसटी कामगाराच्या वारसांना नोकरीही दिली जाणार आहे, अशी महत्वाची घोषणामंत्री परब यांनी यावेळी केली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसास गदारोळाने सुरुवात झाली. अधिवेशनास परिवहन विभागामार्फत घेणायत आलेल्या निर्णयाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी एसटी कामगारांच्या आत्महत्या, मृत्यू पश्च्यात त्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत याबाबत माहिती दिली.

यावेळी परिवहनमंत्री परब म्हणाले की, राज्यात 57 एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्या मृतांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्यांची आत्महत्या कोणत्या कारणांमुळे झाली याचाही अधिक तपास केला जाणार आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या या महत्वाच्या घोषणेमुळे राज्यातील एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या कुटूंबियांना दिलासा मिळणार आहे. एसटी कामगारांच्या आत्महत्येवरून भाजपकडून राज्य सरकावर चांगलीच टीका करण्यात आली होती.