हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर जर एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांना केला असता त्यांनी सूचक विधान केलं.
कालपर्यंत 2 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले असून कारवाई यापुढे अधिक कडक केली जाईल, असा सूचक इशाराही परब यांनी दिलाय. दरम्यान, एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का? असा प्रश्न अनिल परब यांना केला असता त्यांनी सूचक उत्तर दिलंय. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं अनिल परब म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे कामगारांना भडकवण्याचे काम करत आहेत असा आरोप अनिल परब यांनी केला.भाजप कामगारांना भडकवून आंदोलन चिघळवत आहे, अस म्हणत त्यांनी नितेश राणेंचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या वर बोलण्याची राणेंची पात्रता आहे का असा तिखट सवाल अनिल परब यांनी केला.