मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं मागील वर्षी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, हे वृत्त चुकीचं असून कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील. यासंबंधी मीडियातून फिरत असलेल्या बातम्या चुकीच्या असून, कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
यासंबंधी मीडियामधून फिरत असलेल्या बातम्या चुकीच्या असून,कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही.
— Anil Parab (@advanilparab) July 20, 2020
आर्थिक खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं २०१९ मध्ये भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त होतं. त्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर परब यांनी या प्रकरणावर विस्तृत भूमिका मांडली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”