शिर्डी प्रतिनिधी | आज भल्या सकाळी एकाच घरातील तिघांचा खून करण्याची हृदय द्रावकघटना घडलीआहे. तर त्याच परिवारातील अन्य दोन व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात ते आहे. हि घटना शिर्डी जवळील निमगाव या गावी घडली आहे.
आज शनिवारी भल्या सकाळी साडे सहा वाजता मंगेश कातोरे यांच्या वस्तीवरील ठाकूर कुटुंबावर हल्ला करण्यात आला. घराच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे याने ठाकूर पति-पत्नीला कोयत्याने वार करून खल्लास केले. त्यानंतर शाळेत जाण्यासाठी आवराआवर करणाऱ्या १६ वर्षीय मुलीला देखील आरोपीने ठार केली. त्यानंतर तो शेजारीच असलेल्या स्वतःच्या घरात जाऊन जाऊन बसला. हत्येचे कारण अदयाप समजले नाही.
दरम्यान या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर आणि एक सहा वर्षांची मुलगी बचावली आहे. मात्र हे दोघे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साईबाबा मंदिर स्ट्रटच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने निमगावसह शिर्डी देखील हादरली आहे. तसेच घटनास्थळी एकाच वेळी एवढ्या हत्या झाल्याने रक्ताचा सडाच पडला होता. तसेच आरोपी अर्जुन पन्हाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनील कटके करत आहेत.