राजस्थानहून ठाण्याकडे निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात, Video आला समोर

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्याच्या कापूरवाडीजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर राजस्थानहून संगमरवरी घेऊन ठाण्याकडे निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात (accident) झाला आहे. दिशा दर्शक खांबाला धडकून हा अपघात झाला. ही धडक इतकी भयानक होती, की चालकासह तीन लोक आतमध्येच अडकले. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभाग, ठाणे आपत्ती विभाग, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

2 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर ट्रकच्या आतमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानच्या चित्तौडगड येथून 25 टन संगमरवरी दगड घेऊन हा ट्रक ठाण्याच्या वागळे इस्टेट या ठिकाणी येत होता.

यादरम्यान घोडबंदर रोडवरुन येत असताना ट्रक चालकाचे नियंत्रण बिघडले आणि हा ट्रक दिशा दर्शक खांबाला धडकला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात इतका विचित्र होता की ट्रक चालकासह दोघेजण आतमध्येच अडकले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर