नवले ब्रिज अपघात : टँकर ड्रायव्हरसह क्लीनरला अटक

Maniram Chhotelal Yadav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव टँकर एक-दोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने खळबळ उडाली. या भीषण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. आरोपी ड्रायव्हर मनीराम छोटेलाल यादव व क्लीनर ललित यादव या दोघांना सिंहगड पोलिसांनी पुण्यातील चाकण मधून अटक केली आहे.

रविवारी 20 नोव्हेंबरला रात्री पुण्यातील नरे आंबेगाव रोडवर ट्रक चालकाच्या चुकीमुळे तब्बल 48 गाड्यांचा भीषण अपघात झाला होता. अपघातात (Accident) आणि चालक आणि प्रवासी जखमी झाल्यानंतर आरोपी यादव हा ट्रक जाग्यावर सोडून गेला होता. आरोपी ड्रायव्हर चाकणमध्ये एका ट्रकच्या खाली लपून बसण्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.

आरोपी मनीलाल यादव यांच्यावर अपघाताप्रकरणी पुण्यातील सिंहगड पोलीसठाण्यात भारतीय दंड विधान सहिंतेच्या कलम 279,337,338,427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात वाहन क्रमांक AP 02 TE 5858 चा चालक मनीराम छोटेलाल यादव, (वय 24, रा. ग्राम उमरिया, तहसील गुड, जिल्हा रिबा मध्यप्रदेश) तसेच ट्रकवरील क्लीनर ललित यादव, (वय 24, रा. ग्राम महूगंज जिल्हा रिबा मध्यप्रदेश) यांना सिंहगड रोड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या दोन्ही आरोपींना चाकणमधील नानेकर वाडी येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

100 पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा

नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर या ठिकाणच्या अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रशासनाने अखेर या परिसरातील अतिक्रमणावर मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून 100 पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेचे शेकडो कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली.

नेमकं काय घडलं होतं?

रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास पुण्यात मोठी दुर्घटना घडली होती. नवले पूलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की यात सुमारे 48 वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.