Twitter ची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनी ‘हे’ फीचर करणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वादाच्या पार्श्वभूमीवर आता ट्विटर (Twitter) ने एक मोठी घोषणा केली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने आता पुढच्या महिन्यात 3 ऑगस्टपासून फ्लीट्स फीचर (Fleets Feature) बंद करण्याची घोषणा केली आहे. ट्विटरने मागील वर्षी भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील येथे टेस्टिंग म्हणून फ्लीट फीचर जाहीर केले होते. कंपनीने नंतर नोव्हेंबरमध्ये हे फीचर जागतिक स्तरावर बाजारात आणले. ट्विटरच्या या फीचरद्वारे युझर्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असत जे 24 तासांनंतर ते आपोआप गायब व्हायचे.

ट्विटरने काय म्हटले ते जाणून घ्या
ट्विटरने असे म्हटले आहे की, ते 3 ऑगस्टपासून हे फ्लीट्स फीचर बंद करत आहे. यामागील कारण स्पष्ट करताना या सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की, ते हे फीचर काढून घेत आहे कारण ते युझर्सना आकर्षित करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले. कंपनीने यासाठी माफी मागितली आहे. जागतिक स्तरावर आपल्या सर्व युझर्स साठी फ्लीट्स सर्व्हिस सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांनतर ट्विटरने हे पाऊल उचलले आहे.

एलन मस्कने जॅक डोर्सीला रिक्ववेस्ट केली
ही बातमी समजताच युझर्समध्ये धक्काच बसला. त्याच वेळी, ट्विटरवर नेहमीच ऍक्टिव्ह असलेले Tesla आणि SpaceX चे CEO Elon Musk देखील अस्वस्थ झाले. ट्विटरचे सीईओ Jack Dorsey यांना या फीचरच्या जागी नवीन सुविधा देण्याची रिक्ववेस्ट केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group