देऊर सोसायटी, पार्श्वनाथ पंतसंस्थेच्या अपहार प्रकरणात दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्ह्यातील दोन पंतसंस्थांच्या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. देऊर विकास सेवा सोसायटी देऊर (ता. कोरेंगाव) येथे 2 कोटी 16 लाख 15 हजार 187 रुपयांच्या अपहारप्रकरणी चेअरमन, संचालक व सचिव अशा एकूण 36 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तीन वर्षापासून फरार असणारा संशयित आरोपी विजय शांताराम कोकणे (रा. देऊर ता. कोरेगाव) याला अटक करण्यात आली आहे. अपहारप्रकरणी कोकणे याला फरारी घोषित करण्यात आले होते. संशयिताबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी याप्रकरणातील अपहारप्रकरणी हर्षद मोहनलाल शहा (वय- 70, रा. धायरी, पुणे) हे पोलिसांना पाहिजे होते. चिंतामणी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत सपोनि शिवाजी भोसले, फौजदार प्रकाश उमाप, पोलिस प्रमोद नलावडे, मनोज जाधव, प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, संतोष राऊत, शफिक शेख, प्रसाद जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.