कल्याण रेल्वे स्थानकावर बाळाची चोरी, घटना CCTVमध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याण रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काही अज्ञात लोकांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून एका अडीच वर्षांच्या बाळाची चोरी (two year old child kidnapped at kalyan railway station) केली आहे. हि संपूर्ण घटना स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाळाची आई वडापाव घेण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गेली असताना हि चोरीची (two year old child kidnapped at kalyan railway station) घटना घडली. ही महिला बिहार राज्यातून रोजगाराच्या शोधासाठी आली होती. हाती आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे.

काय घडले नेमके?
27 वर्षीय संजू देवी राजवंश ही महिला रोजगाराच्या शोधासाठी आपल्या अडीच वर्षाच्या मुलासह कल्याणमध्ये दाखल झाली होती. ही महिला तीन दिवसांपूर्वी बिहारहून रोजगार मिळवण्याच्या उद्देशाने कल्याणमध्ये आली होती. हि महिला पहाटे वडापाव घेण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर गेली होती. यावेळी ती आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपवून गेली होती. आई आपल्या मुलाजवळ नसल्याचा फायदा घेत आरोपींनी मुलाचे अपहरण (two year old child kidnapped at kalyan railway station) करून घटनास्थळावरून पळ काढला.

काही वेळानंतर या मुलाची आई घटनास्थळी प्लॅटफॉर्मवर आली. तेव्हा आपला मुलगा त्या ठिकाणी नसल्यामुळे (two year old child kidnapped at kalyan railway station) तिला मोठा धक्का बसला. ती आपल्या बाळाला शोधू लागली. तिने प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांना आपल्या मुलाबद्दल विचारपूस केली. पण तिला पुरेशी माहिती मिळाली नाही. तिने मुलाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा कुठंच पत्ता लागला नाही. त्यामुळे ती घाबरली. आपलं बाळ मिळत नसल्याने ती हवालदिल झाली आणि रडू लागली. यानंतर तिने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना उल्हासनगर येथून अटक केली. तसेच आरोपींकडून अपहरण (two year old child kidnapped at kalyan railway station) केलेल्या अडीच वर्षाच्या मुलाला देखील ताब्यात घेतले.

हे पण वाचा :
धारावीच्या वरिष्ठ पोलिसांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत धरला ठेका

आम्हाला धोका असेल तर समोरच्यांनाही नाही का?; विधानपरिषद निवडणुकीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया

भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान

मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा; भाजप नेत्याचे सूचक ट्विट

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल