व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा; भाजप नेत्याचे सूचक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार असून तत्पूर्वीच भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सूचक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा… अस अनिल बोंडे यांनी म्हंटल.

विधानपरिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 शिवसेना 2 आणि भाजपचे 5 उमेदवार आहेत. त्यामुळे कोणाचा तरी एकाचा गेम होणार हे मात्र नक्की

बोंडे यांच्या ट्विट चा अर्थ नेमका काय?

पक्षणिहाय संख्याबळ पाहता, राष्ट्रवादी आणि शिवसेना सेफ आहे पण काँग्रेसला दुसऱ्या उमेदवारासाठी अधिकची मतांची गरज आहे. मात्र अस न काही न होता शिवसेनेचे आमिष पाडवी यांचा या राजकारणात बळी जाईल असा अंदाज अनिल बोंडे यांच्या ट्विट मध्ये दिसत आहे.