व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धारावीच्या वरिष्ठ पोलिसांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत धरला ठेका

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्ष पंढरपूर वारी करण्यात आली नव्हती. मात्र, आता यंदा निर्बंधमुक्त वारी करण्याचा योग वारकऱ्यांना आला असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत विठू माऊलीचं नाव घेत वारीत चालतात. दरम्यान या उत्साहाच्या वातावरणादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा (Senior Inspector of Police Vijay Kandallangavkar) व्हिडिओ वायरल होत आहे.

यात धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळंगावकर (Senior Inspector of Police Vijay Kandallangavkar) टाळ वाजविण्यात दंग असल्याचे दिसत आहेत. विजय कांदळगावकर (Senior Inspector of Police Vijay Kandallangavkar) हे धारावी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कीर्तन करणाऱ्या मंडळींमध्ये कांदळंगावकर (Senior Inspector of Police Vijay Kandallangavkar) पोलिसांच्या गणवेशात टाळ मृदुंगाच्या गजरात ठेका धरताना दिसत आहेत. विजय कांदळगावकर हे त्यांच्या चांगल्या कामासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात.

कोरोनाच्या काळात गरीब, मजूर आणि गरजूंना अन्नदान करण्यापासून, त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था करणे, त्यांना राशन पुरवणे अशी बरीच मदत कांदळगावकर (Senior Inspector of Police Vijay Kandallangavkar) यांनी केली होती. ज्यासाठी त्यांचा सन्मानही करण्यात आला होता. आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये विजय कांदळगावकर (Senior Inspector of Police Vijay Kandallangavkar) यांनी आपल्या गळ्यात टाळ घातले आहेत आणि हे टाळ वाजवत ते अगदी मग्न होऊन ठेका धरत आहेत. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून पोलीस अधिकाऱ्याचा हा साधेपणा सगळ्यांचे मन जिंकत आहे.

हे पण वाचा :
मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा; भाजप नेत्याचे सूचक ट्विट

विक्रमी पावसानंतर मेघालयातील मावसिनराममध्ये निसर्गाने केले रौद्र रूप धारण

किरकोळ कारणातून रिक्षावाल्याने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला थेट इशारा