भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होत असून तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत पण पक्षाला सोडून ते मला मतदान करणार नाहीत असे खडसे म्हणाले.

विधानभवनाकडे रवाना होताना खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का असा सवाल केला असता खडसे म्हणाले, होय भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहे, पण ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत त्यामुळे पक्षाला सोडून ते मला मतदान करतील अशी काही परिस्थिती नाही असे खडसेंनी स्पष्ट केलं .

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी २ तर भाजपकडून ५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडे ५ वा उमेदवार निवडून आणण्यासाठी १८ मतांची गरज आहे त्यामुळे भाजप पुन्हा एकदा चमत्कार करणार कि महाविकास आघाडी राज्यसभेतील पराभवाचा वचपा काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे

Leave a Comment