प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कांसाठी कार्यालय बांधतोय; उदय सामंतांची प्रतिक्रिया

Uday Samant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाणावर दावा केल्यानंतर आता दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन बांधन्याय येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल आदर कायम आहे”, असे उदय सामंत यांनी म्हंटले.

मंत्री सामंत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी लिहले आहे की, “मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावे यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि शिवसेना भवन कुणाचं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचवेळी शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहे.