हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाहीत. इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारेच या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी, असे सांगितले. त्याचबरोबर मंत्री सामंत यांनी अजून एक महत्वाचे विधानही केले. त्यांनी महाविद्यालये 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान सुरु करण्याचा विचार केला जात असल्याचे विधान मंत्री सामंत यांनी केल आहे.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही एक निर्णय घेतला आहे कि, येत्या आठ दिवसात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी प्रत्येक जिल्हाधिकारी व कुलगुरूंशी बोलले पाहिजे. त्या जिल्ह्यातील कोरोना परिसस्थिती काय याबाबत माहिती घेतली पाहिजे. आम्ही लवकरात लवकर प्रत्यक्षरित्या कशा पद्धतीने कॉलेज सुरु करता येतील याबाबत प्रयत्न करीत आहोत.
कोरोनाचा प्रादुर्भाव तसा काही काही जिल्यात कमी झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करीत आहोत. याबाबत आम्ही उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांकडून अहवालही मागविला असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.