नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कामकाज सध्या संसदेच्याकनिष्ठ सभगृहातसुरु आहे. आज सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्या वेळी उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी सभागृहात जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या गेल्या.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले ज्यावेळी शपथ घेण्यासाठी ध्वनी क्षेपकाच्या जवळ आले तेव्हा त्यांना लोकसभा महासचिवांनी मराठी शपथेचा नमुना द्यायचा का असे विचारले असता उदयनराजेंनी इंग्रजी नमुना मागून घेतला. इंग्रजी शपथेचा नमुना कागद हातात घेऊन उदयनराजेंनी इंग्रजीमधून शपथ घेतली.
शपथ घेतल्यानंतर उदयनराजेंनी जय भारत , जय भवानी , जय शिवाजी असा जय घोष केला. त्यानंतर त्यांनी खासदार म्हणून स्वाक्षरी उमठवली. त्यानंतर ते आपल्या स्थानी जाई पर्यंत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.