उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट; पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन

0
142
Udayan Raje Bhosale Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याने भाजप नेत्यांकडून जल्लोष केला जात आहे. या दरम्यान आज साताऱ्याचे भाजप नेते तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांनी उद्या १ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी म्हणून प्रयत्न केले जात आहे. तर भाजप नेत्यांकडूनही फडणवीसांना पाठींबा दर्शवत त्याचे अभिनंदन केले जाय आहे. दरम्यान आज खासदार उदयनराजे भोसले यांनी फडणवीसांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी उदयनराजे भोसले व देवेंद्र फडणवीस यांची काही तास राज्यातील घडामोडी व शपथविधीबाबत चर्चाही झाली असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होत असल्याने शिंदे समर्थक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here