हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. या दरम्यान भाजप नेत्यांकडून शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “वेळीच जर आमदारांना विश्वासात घेतले असते त्याच्याशी संवाद साधला असता तर आज हि वेळ आली नसती. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदारांनी बंडखोरी केली आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. शिवसेनेत बंड हे होणारच होते. बंडखोर आमदारांना आता निर्णय घ्यावाच लागणार आहे, असे भोसले यांनी म्हंटले.
उदयनराजे भोसले यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मी फडणवीस याची भेट घेतली आहे. राज्यात अनेक घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेतील आमदार निघून गेले आहेत. ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यानंतर वारंवार सांगितले जाते कि भूकंप झाला. वास्तविक पाहिले तर हे होणारच होते. ज्यावेळेस वेगवेगळ्या पक्षातील लोक, प्रतिनिधि एकत्रितपणे येऊन आघाडी स्थापन केली. विचार करून जर निर्णय घेतला असता तर हे गतबंधन कधीच झाले नसते.
आता स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यानंतर आमदारकी, खासदारकी आहे. हे जे गतबंधन झाले होते ते नेमके सत्ता स्थापन करण्याकरता झाले होते. अनैसर्गिक असे हे गतबंधन आहे. कारण भाजप अंडी शिवसेनेचे विरोधक म्हणून त्या त्या जिल्हा, तालुक्यातील प्रतिस्पर्धी कोण असतील तर ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेत, अशी टीकाही उदयनराजे भोसले यांनी केली.