या सरकारने आपल्याला भिकेला लावले : उदयनराजे भोसले

1
52
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |सकलेन मुलाणी

सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

नमाजाला भाषण रोखलं
उदयनराजे भोसले यांचं भाषण सुरु झालं त्यावेळी दुपारचं नमाज सुरु झालं. जोहारचं नमाज सुरु झाल्याने उदयनराजेंनी भाषण रोखलं. हे नमाज झाल्यानंतर उदयनराजेंनी आपली बँटिंग सुरु केली.

मोदींवर हल्लाबोल

पाच वर्षपूर्वी ज्यांना बहुमत दिले, त्यांनी मन की बात करुन करुन अभिनय केला. मात्र काहीच पदरात पडले नाही, दिशाभूल केली, असा आरोप उदयनराजेंनी मोदींवर केला.

तळागाळातील जनता गाळात

बहुमत मिळाल्यावर विसर पडला. तळागाळातील जनता आणखी गाळात गेली. 15 लाख मिळाले नाहीत. मात्र नोटबंदीत पैसे काढून घेतले. अडीच कोटी नोकरी दिली नाही. मात्र बेरोजगार झाले, असे टोमणे उदयनराजेंननी लगावले.

देशापेक्षा उद्योजक मोठा कसा?

या सरकारने भिकेला लावलं,आपण आता विचार केला पाहिजे, पाच वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी राजा असून आता जन की बात सुनावली पाहिजे. ब्रिटिश ईस्ट कंपनीसारखं छाटछूट कंपानीने राज्य केलं. नावापुरती लोकशाही असून हुकूमशाही सुरु आहे. ठराविक उद्योगपतींना अधिकार दिले. ईस्ट इंडिया कंपनीसारखी बिजनेस कंपनी निर्माण केली,देशापेक्षा उद्योजक मोठा कसा? उद्योजक उद्या नद्या विकतील, मग त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायचं का, असा सवाल उदयनराजेंनी विचारला.

हसू नका, शिट्या वाजवायला काय झाले

यादरम्यान काही लोक हसत होते, शिट्ट्या वाजवत होते, त्यावेळी हसू नका, शिट्या वाजवायला काय झाले, असं म्हणत उत्साही कार्यकर्त्यांना उदयनराजेंनी झापले.

लाईट गेली

सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर रशिया सारखे तुकडे होतील, असं उदयनराजे म्हणाले. याच दरम्यान लाईट गेल्याने उदयनराजेंनी माईक सोडून भाषण केलं. अहंकार माजला आहे. ठीक आहे, पाहून घेऊ अशी भाषा ते करतात. सरकार उलथून टाकल्याशिवाय राहायचं नाही, सरकार गेले नाही तर सोमालिया होईल, कायदा कानून नाही, बलात्कार, खून होतोय, ही अवस्था आपली होईल, असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजेंची डायलॉगबाजी

मैं बोलता हू ओ मैं करता हूँ और जो नही बोलता हूँ ओ मैं डेफिनेटली करता हूं, असं म्हणत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली.

शिवस्मारक भूमीपूजनाला इस्त्रायलची सुरक्षा

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्री स्मारक भूमीपूजन निमंत्रण दिले होते. आम्ही बोटीतून चाललो होतो, या बोटीत पंतप्रधान, मुख्यमंत्री होते, पूजा सुरु होती, त्यावेळी इंग्रजी बोलणारी अंतर्गत सुरक्षा होती, इनर सेक्युरीटी इस्त्रायलची सुरक्षा होती. मात्र आपल्या जवानांमध्ये काय कमी आहे, असा सवाल उदयनराजेंनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here