सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वादविवाद सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या एकाच पक्षात असणारे सातारचे हे दोन राजे एकमेकांसमोर आले की वातावरण ताईट झाल्याशिवाय राहत नाही. कित्तेकदा तो वाद मिटवण्यासाठी थेट सातारा एस.पी. नाच मध्यस्थी करावी लागते असा इतिहास आहे. आज मात्र एका कार्यक्रमानिमित्त एकमेकांसमोर आलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी आपआपल्यातील वाद विसरुन हस्तांदोलन केले. यावेळी उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंचा खादा दाबला. त्यावर ‘सारखा खांदा का दाबताय..मी फिट आहे. हवं तर प्रात्याक्षिक दाखवू शकतो’ असं शिवेंद्रराजे म्हणाले. यावर उस्थितत कार्यकर्त्यांमधे हास्याचा फवारा उडाला.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथे मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकमेकासमोर आले. यावेळी आता काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र दोन्ही राजांनी आपला वाद विसरून एकमेकांशी हस्तांदोलन केले. यावेळी उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचा खांदा दाबला. त्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी, ”सारखा खांदा का दाबता माझा?’ असं विचारलं. ‘फिटनेस पाहतोय कसा आहे ते? असं उदयनराजे म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देताना ‘माझी बाॅडी फिट आहे, हवं तर प्रात्यक्षिक दाखवू शकतो’ असं शिवेंद्रराजे म्हणाले. आपण कायमच फिट असतो असा टोमणाही शिवेंद्रराजेंनी लगावल्याने उपस्थित कार्यकर्त्यांत एकच हास्यकल्लोळ उडाला.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
[youtube https://www.youtube.com/watch?v=LBhK-y3G1-s&w=560&h=315]
इतर महत्वाचे –
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
Hawa Fakt 007…
Udayan maharaj