नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर; संपूर्ण राज्याचे लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढत असतानाच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या (14 जून) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मोदी यांच्या हस्ते सकाळी देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर मोदी मुंबईला जातील. मोदी यांच्या हस्ते राजभवनावर गॅलरीच्या उद्‌घाटनाचा दुसरा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील.

दरम्यान, यापूर्वी लता मंगेशकर फाऊंडेशनचा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आता होता. तेव्हा कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. त्यामुळे त्यावेळी मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नव्हती. आता मात्र दोन्ही नेते उद्या एकाच व्यासपीठावर येणार असून ते नेमकं काय बोलणार यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Leave a Comment