सध्याच्या भोंदूगिरीत या माणसाकडून… ; उद्धव ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सामनातील मुलाखत आज प्रसारित करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हि मुलाखत घेतली असून यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणावर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मात्र आजच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं मात्र कौतुक केलं आहे. अजित पवार हे प्रामाणिक चौकटीत काम करणारे आहेत. सध्याच्या भोंदूगिरीत या माणसाकडूनच काही चांगलं झालं तर पाहावं असं म्हणत ठाकरेंनी सध्याच्या सरकार मध्ये फक्त अजित पवारांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात अजित पवारांची भेट घेतली होती, याबाबत संजय राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अडीच वर्ष ते आमच्याबरोबर होते. या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. तसेच त्यांच्याकडे तेव्हा आणि आत्ताही अर्थखातं देण्यात आलं आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं की, सत्तेच्या साठमारीत राज्याला आणि राज्यातील जनतेला विसरू नका. एक गंमत बघा, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्याकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. मग ते आरोप खरे की अजित पवार खरे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अजित पवारांबद्दल एक गोष्ट सांगतो, एका प्रामाणिक चौकटीत काम करणारा माणसू. प्रशासन आणि त्यांचं खातं अजित पवारांनी व्यवस्थित सांभाळलं होतं. सध्याच्या भोंदूगिरीत या माणसाकडून काही झालं तर पाहावं म्हणून मी त्यांची भेट घेतली. नाहीतर आता कधीही निवडणुका होऊ शकतात असं चित्र आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हंटल.

दरम्यान, हे सरकार ट्रिपल इंजिन सरकार आहे कि डालड्याचा डबा आहे अशी टीकाही उद्धव ठाकरे ठाकरेंनी केली. फडणवीस म्हणतात, ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसलं परंतु राष्ट्रवादीने मग काय खुपसलं की तुम्ही राष्ट्रवादीलाही फोडलं . राष्ट्रवादी फोडण्याअगोदर पंतप्रधानांची राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्या आरोपांचे काय झालं? त्या घोट्याळ्याचे काय झालं? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.