हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना सामनाचे संपादक करण्यात आले होते. मात्र आता मुख्यमंत्रीपद गेल्यांनतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे संपाद्क पदाची जबाबदारी स्वतः घेतील. तर खासदार संजय राऊत यांचे नाव कार्यकारी संपादकपदी कायम आहे.
गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अनेक आमदार- खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच शिवसेनेची बुलुंद तोफ म्हणून ओळखले जाणारे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत सध्या अटकेत आहेत. या सर्व घडामोडीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी सामनाची जबाबदारी स्वताकडेफे घेतली असून येत्या काळात वृत्तपत्राच्या माध्यमातून ते भाजप आणि बंडखोरांवर सामनाच्या माध्यमातून आसूड अशी शक्यता आहे. .
दरम्यान, एकीकडे शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रा आणि निष्टा यात्रेच्या माध्यमातून भाजप आणि बंडखोर आमदारांवर तोफ डागत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही मातोश्रीवर शाखाप्रमुख, पदाधिकारी यांच्या बैठका लावून पक्ष पुनर्बांधणीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यातच आता सामनाच्या माध्यमातून भाजप आणि बंडखोरांवर ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल पाहायला मिळू शकतो.