ठाकरे गटाला मोठा धक्का! कोर्टाने राज्याच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीबाबतची ‘ती’ मागणी फेटाळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्याच्या राजकारणात 5 महिन्यापूर्वी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गट (uddhav thackeray) आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट यावेळी निर्माण झाले. यानंतर आता खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची समीती नेमण्यात आली. यानंतर द्धव ठाकरे गटाकडून 7 न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळली. हा उद्धव ठाकरेंसाठी (uddhav thackeray) मोठा धक्का मानला जात आहे. पाच न्यायाधीशांच्या सध्याच्या घटनापिठासमोरच 10 जानेवारी पुढील सुनावणी होणार आहे.

राज्यपालांच्या वतीने हजर झालेल्या सॉलिसिटर जनरल म्हणाले की, फक्त 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाची सुनावणी व्हायला हवी. न्यायालयाने उद्धव गटाचे (uddhav thackeray) वकील कपिल सिब्बल यांना त्यांच्या मागणीबाबत न्यायालयाला नोट पाठवण्यास सांगितले. यामुळे आता 5 न्यायाधीशांच्या सध्याच्या घटनापिठासमोर पुढील सुनावणी होणार आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या