व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काश्मीरचे 370 कलम हटवताना जी हिम्मत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी; मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींना हात जोडून विनंती

मुंबई | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित केले. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत मुख्यमंत्री ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काश्मीर मधील कलम 370 कलम हटवताना केंद्र सरकारने जी हिम्मत दाखवली तीच हिम्मत आता मराठा आरक्षणासंदर्भातही केंद्राने दाखवावी असं म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांच्या एकमताने घेण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने त्याविरोधात निकाल दिला आहे. आम्ही उच्च न्यायालयात जिंकलो ते सुप्रीम कोर्टात तुम्ही हारलात. तुम्हाला लढताच आलं नाही असं कोणी म्हणत असेल तर असे अजिबात नाही. उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी बाजू मांडली त्याच वकिलांनी आणि त्यांच्याबरोबर आणखी वकिलांना नियुक्त करुन सर्वांनी मिळून सुप्रीम कोर्टात बाजू मांडली अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

तसेच आज बोलताना ठाकरे यांनी मराठा समाजाचे धन्यवाद मानले. मराठा समाजाने फार सामंजसपणे निर्णय ऐकला आहे. कुठेही थयथयाच, आदळाआपट केली नाही. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या नेत्यांनीही सामंजसपणे घेतलं. विशेष करुन छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत समजंसपणे प्रतिक्रिया दिली असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.