BREAKING : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; पुढची रणनीती काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेना (Shivsena) पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने आज गोठवण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरण्यात येणार नाहीये असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. आता यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आता यापुढची रणनीती कशी असेल हे ठाकरे गटाने जाहीर केले आहे.

कोणी काहीही केलं तरी बापाचं नाव हे बापाचंच नाव राहतं. कोणीच आमच्या बापाचं नाव आमच्यापासून काढून घेऊ शकत नाही. शिसेना हे आमच्या बापाचं नाव आहे. निवडणूक आयोग हा काही आमचा बाप नाही आमच्या बापाचं नाव काढून घ्यायला अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.

या सर्व प्रक्रियेत निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागलं आहे हेच संशयास्पद असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ED, Income Tax, सीबीआय या संस्था वेठबिगार होत्याच. पण आता निवडणूक आयोगही वेठबिगार बनली आहे. अर्ज केल्यानंतर कोणीतरी तक्रार केली, आम्ही त्यावर उत्तरही दिलं..पण कोणतीही छाननी न करता केवळ चार तासात निवडणूक आयोगानं निकाल दिला. हा निर्णय देशाच्या संविधानावर घाला घालणारा निर्णय आहे असं म्हणत सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या पाठीत सुरा घुपासण्याचं काम भाजप करत आहे. संपूर्ण महाराष्ट्र डोळे उघडे ठेऊन हे सर्व पाहत आहे. जितके भाजप वाईट वागेल, जितके ते ठाकरेंना त्रास देतील तितके उद्धव ठाकरेंची शिवसेना अधिक भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. देश हुकूमशाहीकडे चालला आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणून हुकूमशाही चालवली तर सध्याचं भाजप काही जाहीर न करताच आणीबाणी आणली आहे अशा शब्दात सावंत यांनी थेट मोदी सरकारवर आरोप केला आहे.

आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुढे काय असा प्रश्न सध्या ठाकरे आणि शिंदे गटाला पडला आहे. यावर उद्या वर्ष बंगल्यावर शिंदे गटाची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाचीही उद्या दुपारी मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये दोन्ही गटांची पुढील रणनीती आखली जाणार आहे.