हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी आपले आमदार हॉटेलमध्ये हलवले आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी कोटा ठरवण्यावरून गोंधळ उडाला होता. तसा गोधळ विधान सभेच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोटा ऐनवेळी ठरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी उद्या सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार मैदानात आहे. निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 26 चा कोटा आवश्यक आहे.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराला कितीचा कोटा ठरवायचा आहे, यासाठी मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधी निर्णय घेणार असल्याचे वर्तवले आहे. राज्यसभेला ज्या प्रकारे दगाफटका बसला होता, तो यावेळी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली असल्याची चर्चा आहे. जेणेकरून शिवसेनेच्या उमेदवारांना कोणताही दगाफटका बसणार नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दगा फटका बसण्यासाठी भाजपनेही वेगवेगळ्या खेळ्या केलेल्या आहेत.




