हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतील बंडखोरी मुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत 26 आणि 27 जुलै ला प्रदर्शित होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुलाखतीचा दुसरा टीजर प्रदर्शित केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे प्रश्न आणि उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तरे पाहायला मिळत आहेत.
या टीजर मध्ये संजय राऊत यांनी सध्याच्या शिवसेनेच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारले आहेत. ठाकरेंनीही या प्रश्नांची उत्तरे आपल्या स्टाईलने उत्तरे देत भाजप आणि शिंदे गटाचे वाभाडे काढले आहेत. उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर..? विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता का? फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले? फुटीर लोकांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसतेय का? असे रोखठोक प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले.
भाग:२
खणखणीत मुलाखत!
सामना.
"उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?"
२६ आणि २७ जुलै pic.twitter.com/RQ15tNEGse— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2022
दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांनी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रदर्शित केला होता. आपलं नक्की काय चुकलं असावं, की महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकला? असे सवाल त्यात संजय राऊत यांनी केलं आहेत. 26 आणि 27 जुलै ला ही मुलाखत प्रदर्शित होणार असून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?? शिवसेनेची आगामी भूमिका काय असेल यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे.