उद्धव ठाकरेंची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी; राजकरणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

latest marathi news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन घेतले होते. त्यानंतर आता 30 वर्षानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात ठाकरे गट सत्ताधाऱ्यांवर तोफ झाडताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, आजच्या या अधिवेशनात संजय राऊतांनी (Sanjay Raut) उद्धव ठाकरेंची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी केली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकमध्ये होत असलेल्या अधिवेशनात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपमध्ये भगवान विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आलाय. आम्ही रामाला पुजू, तुम्ही विष्णूला पूजा; कारण रामाचं धैर्य, शौर्य शिवसेनेमध्ये आणि संयम उद्धव ठाकरेंमध्ये आहे. आपण सगळे हनुमान आहोत, रावणाचे सैनिक हनुमानाला जेरबंद करायला गेले, त्याला कैदेत टाकले तरी दिल्लीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, लंका पेटवायला वेळ लागणार नाही”

पुढे बोलताना, “शिवसेना नसती, तर काल रामाची प्राणपतिष्ठा झाली नसती असे राऊतांनी म्हणले. तसेच, “संपूर्ण देशाचं वातावरण राममय झाले आहे. याच वातावणात उद्धव ठाकरेंनी महाशिबीराची ज्योत पेटवली आहे. त्यामुळे आजपासून आपण कुरूक्षेत्राची लढाई सुरू करणार असून, दिल्लीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे. यासाठी सध्या उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आहेत. काल त्यांनी नाशिक मधील काळाराम मंदिर येथील प्रभू श्रीरामांची आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे देखील होते. आज उद्धव ठाकरेंचा नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आजच त्यांचे राज्यव्यापी महाधिवेशन पार पडणार आहे.