हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीतील खेड (Khed) मध्ये जाहीर सभा आहे. संध्याकाळी 5 वाजता ठाकरेंची तोफ खेडमध्ये धडाडणार आहे. खेड हा शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे.
खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळं त्यांच्या या सभेकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? कोणकोणत्या गोष्टींना हात घालणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असेल.
उद्धव ठाकरेंच्या खेड दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचाही ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. याशिवाय अनेक आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंचा हा दौरा पक्षसाठी किती फलदायी ठरतो हे पहायला हवं. तसेच कोकणातील अनेक नेते शिंदेंसोबत गेल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यात उद्धव ठाकरेंना यश मिळत का हे सुद्धा पाहावं लागेल.