हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा पवई येथील वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. “शिवसेना आज आपला 56 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिवसेना स्थापनेवेळी माझे वय 6 होत. शिवसेना कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहू. पक्षासाठी वार झेलणाऱ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. 56 वर्षात शिवसैनिकांनी काय केले असा प्रश्न पडत असेल तर त्यांना अमी सांगतो की, 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या आमदार, शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी हॉटेलमध्ये शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आमदार आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत सांगायचे झाले तर मला या निवडणुकीची अजिबात चिंता नाही.
अनेक शतके शिवसेना राहणार आहे. मला एका गोष्टीचा अभिमान नक्कीच आहे. कारण माझ्या वडिलांनी शिवसेना या पक्षाला जन्म दिला. ५६ वर्षातील अनेक गोष्टी मनात ताज्या आहेत. मी पहिल्यादा पक्षप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा माझ्या डोक्यासमोर नकळत शिवसेना स्थापनेचा तो शिवाजी पार्कातीत ते घर, वनश्रीएचके घर माझे आजोबा दोन काका हे सर्व होते.
५६ वा शिवसेना वर्धापन दिन – LIVE https://t.co/5tYYcJvwZG
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 19, 2022
विदर्भ मराठवाड्यातील लोकांना दिवाकर रावते यांची ओळख करून देण्याची गरज नाही. बाळासाहेबांनी जेव्हा जेव्हा जबाबदारी दिली त्यावेळी दिवाकर रावते यांनी काम केले. मार्मिकचे अंक हे रावते यांनी अक्षरश: गाडीवर घेऊन विकले होते, असे हे रावते आहे. त्यानंतर बाळासाहेबांनी सुभाष देसाई यांना फोन करून माझ्यासोबत काम करण्यास सांगितले. तेव्हापासून देसाई माझ्यासोबत आहे. दोघेही नेते माझ्यापेक्षा वयांनी मोठे आहात. दोघांना मी कधी निवृत्त होऊ देणार नाही,