हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा 6 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रात दाखल होत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून भारत जोडो यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेत कोण कोण सहभागी होणार याविषयी चर्चा होत असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत माझं निश्चित नाही. पण आमचे नेते नक्की भारत जोडो यात्रेत सामील होतील, असे ठाकरेंनी म्हंटले.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. विजयानंतर ऋतुजा लटके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंनी माध्यमाशी संवाद साधत भरत जोडो यात्रेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, राजहूल गांधी यांच्याकडून संपूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा काढली जात आहे. त्याच्या या यात्रेत आमच्या पक्षातील नेते नक्की सामील होतील.
देगलूरहून सुरू होणारी भारत जोडो यात्रेसाठी महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, शरदचंद्र पवार यांच्या सह महाविकास आघाडीतील नेत्यांना काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये महाविकास आघाडीमधील कोणकोणते नेते सहभागी होतील याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.