25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा, कामाला लागा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत काल जाहीर सभा पार पडल्यानंतर शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी “गाव तिथे शिवसेना शाखा’ स्थापन करण्याचे आदेश सर्वच जिल्हा प्रमुखांना दिले. तसेच पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील, असे काम करा. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले.

राज्यात न्यायाने स्थापन करण्यात आलेल्या महा विकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेत सर्व जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात कशी जाईल याबाबत मार्गदर्शन केले. पक्षाच शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत शिवसेना गावागावात पोहोचवा, असे आदेश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पुढची 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार असल्याचे विधान केले असल्यामुळे याला भाजप तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडूननेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार? हे पहावे लागणार आहे.