राज्यसभेत विजयाचा गुलाल कुणाचा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण या निवडणुकीसाठी 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय पक्षांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार कोणता उमेदवार जिकणार आणि राज्यसभाईत कुणाचा गुलाल उडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. या निवडणुकीत आम्हीच गुलाल उधळणार आहोत. आमचेच उमेदवार जिंकणार आहेत, असे ठाकरे यांनी म्हंटले.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवन परिसरातून रवाना झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या निवडणुकीत गुलाल कुणाचा? असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारला असता त्यांनी एका दमात होय… नक्कीच आमचा विजय हा निवडणुकीत होणार आहे. आणि आम्हीच गुलाल उधळणार आहोत. त्यामुळे विजय हा नक्क आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, आज दिवसभरात राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, शिवसेना या अपक्षातील वरिष्टांकडून मतदान करणाऱ्या आमदारांसह अपक्षांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. मतदानावेळी मात्र काहींच्या मतपत्रिकेवर आक्षेपही घेण्यात आला.

Leave a Comment