हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधताण महत्वाचे विधान केले. “सर्वांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्या केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या असो, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
मुंबईतील ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमास आज उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत. लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.
प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 5,00,000 घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही 5 लाख घरे बांधत आहोत. 3500 कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे. तसेच 2022-23 मध्ये जल जीवन मिशनमध्ये 19 लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी 1900 कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.