बढतीमध्ये आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे प्रस्तावित – उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषदेतील भाजप आमदार हरीसिंग राठोड यांनी इतर राज्यांमध्ये बढती देताना आरक्षण वापरलं जातं, मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल आज उपस्थित केला. या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चपखल उत्तर दिलं आहे.

thare

राज्यातील कुठल्याच प्रवर्गावर अन्याय होणार नाही अशी भूमिका राज्य सरकार घेईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मात्र बढती प्रक्रियेतील आरक्षणाचा महाराष्ट्र राज्यपुरता असलेला प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रस्तावित असल्याने सध्यातरी राज्य सरकारला यात हस्तक्षेप करता येणार नाही असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत दिलं.

केंद्रातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी, विशेषतः न्यायालयीन जागांमध्ये ज्येष्ठतेनुसार आणि आरक्षणानुसार महाराष्ट्रातील अनेक लोक काम करत आहेत याकडं लक्ष वेधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरीसिंग राठोड यांच्या शंकेचं निरसन केलं. हरीसिंग यांचा आज सभागृहातील शेवटचा दिवस असल्याची आठवणही ठाकरे यांनी यावेळी करुन दिली.

Leave a Comment