हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा (Lok Sabha 2024) निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच या 2024 निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी उत्तम आहे असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होते. याबाबत खुद्द उद्धव ठाकरेंनाच विचारलं असता त्यांनी स्प्ष्टपणे यावर उत्तर दिले आहे.
आज कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना संजय राऊतांच्या विधानाबद्दल विचारण्यात आले. यावेळी माझ्या मनात असं कोणतंही स्वप्न नाही, मी स्वप्नात रंगणारा आणि दंगणारा नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल. माझ्यावर जी जबाबदारी येते ती पार पाडतो. तशीच माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. मला त्यावेळी ते पद कसे स्वीकारावे लागले, त्या खोलात जाण्याची गरज नाही. मात्र, असे काहीही माझ्या मनात नाही. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांनी खांद्यावर घेणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप सरकारला पाठिंबा; राजकीय घडामोडीने खळबळ
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/5n0HMMBFSA#Hellomaharashtra @NCPspeaks @BJP4India
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 8, 2023
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-
राजकारणात कधीही काहीही होऊ शकत. आत्ताच भाकीत करणं तेवढं सोपं नाही परंतु देशात आत्ता जे विरोधी पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा महत्त्वाचा आहे. ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातून येतात आणि ते ठाकरे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी उत्तम आहे असं संजय राऊत म्हणाले होते.