हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार आहे अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन’चा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपला सर्व काही कमी पडू लागल आहे. भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाल आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. स्वतःला स्वप्नं पडत नाहीत म्हणून दुसऱ्याची स्वप्ने चोरा असा भाजपचा कार्यक्रम आहे अस उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. त्यांच्यात नैतिकता नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. आता ते मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी लाळ मारत आहेत. पण मराठी माणूस त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही अस ते म्हणाले.